Friday, October 30, 2020


Home आरोग्य अमिताभ बच्चन यांनी केली विमानाची सोय

अमिताभ बच्चन यांनी केली विमानाची सोय

 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लॉकडाऊन काळात निर्माण झालेला स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदतीची हात पुढे केला आहे. अलिकडेच त्यांनी मुंबईत अडकलेल्या 200 हून अधिक स्थलांतरीत मजूरांना उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी पाठण्यासाठी बसेसची सोय केली होती. त्यानंतर आता 500 हून अधिक मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी फ्लाईट्सची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

मिड डे च्या रिपोर्टनुसार, बिग बी यांनी स्थलांतरीत मजूरांना वाराणसी येथे पाठवण्यासाठी 3 चार्टर फ्लाईट्स बुक केले आहेत. या सर्व कामाची पाहाणी बिग बी यांच्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर राजेश यादव करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या या मदतकार्याची कोठेही चर्चा किंवा प्रचार होऊ नये, अशी बिग बी यांची इच्छा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजूरांवर ओढावलेली परिस्थिती पाहून अमिताभ बच्चन अतिशय दुःखी झाले होते आणि या कठीण काळात ते मदत मजुरांची मदत करु इच्छित होते.
या इच्छेतूनच त्यांनी वाराणसीसाठी इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट बुक केली होती. आज सकाळी ती वाराणसीसाठी रवाना झाली. यात विमानातून एकूण 180 प्रवासी स्वगृही परतणार होते. यासाठी सकाळी 6 वाजता त्यांना विमानतळावर दाखल होण्यास सांगितले होते. दरम्यान या मजुरांना ट्रेनने घरी पाठवण्याचा मानस होता. मात्र ट्रेनची सोय न झाल्याने विमानाचा पर्याय निवडण्यात आला. इतर दोन विमाने देखील आज वाराणसीसाठी रवाना होतील. याशिवाय यापुढे पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि इतर राज्यात मुजरांना पाठवण्यासाठी ट्रेन्सच्या तिकीटाचा सर्व खर्च अमिताभ बच्चन करणार आहेत.(लेटेस्टली.)

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..