Thursday, October 22, 2020


Home आरोग्य अंगठी ते मंगळसूत्र पासून ते घड्यळापर्यंत सर्व काही करा सॅनिटाईज;जाण्यानं घ्या पद्धत..

अंगठी ते मंगळसूत्र पासून ते घड्यळापर्यंत सर्व काही करा सॅनिटाईज;जाण्यानं घ्या पद्धत..

     कोरोना संदर्भात रोज काही ना काही माहिती समोर येत आहे. आज आपण सॅनिटाईज करण्याची सरोवत्तम पद्धत जाणून घ्या..

करोनाचा वाढता संसर्ग-
लोक आपले हात, कपडे योग्य पद्धतीनं नीट स्वच्छ करत आहेत. पण अंगठी, घड्याळ यासारख्या वस्तू सॅनिटाइझ करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्यामुळे तुम्ही करोना व्हायरसच्या संपर्कात येऊ शकता. कित्येक महिला मंगळसूत्र, बांगड्या, सोनसाखळी तसंच पुरुष अंगठी आणि घड्याळ यासारख्या गोष्टी वापरतात.

​सॅनिटाइझेशन आवश्यक

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये या सर्व गोष्टी देखील सॅनिटाइझ करण्याची सवय लावून घ्या. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दागिनेही सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या ठिकाणाशी तुमचा संपर्क आला तर या वस्तू योग्य पद्धतीनं सॅनिटाइझ करा. असे न केल्यास करोना व्हायरसची लागण होण्याचा धोका वाढू शकतो. जाणून घेऊया कशा पद्धतीनं करायचे सॅनिटाइझेशन.

 

​गरम पाणी आणि साबण

दागदागिने स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि सौम्य साबणाचा वापर करावा. तुमच्याकडे लिक्विड साबण असल्यास उत्तम. बाहेरुन घरी आल्यानंतर आपली अंगठी आणि अन्य दागिने थोड्या वेळासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा. जेणेकरून त्यावर जमा झालेली धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. यानंतर साबण आणि ब्रशच्या मदतीनं दागिने स्वच्छ करा. दोन्ही हातांमध्ये Gloves घालून हलक्या हातानं दागिन्यांची स्वच्छता करा.

 

​मोती, पन्नासाठी सॅनिटाइझरचा वापर करू नका

मोती, पन्ना, कोरल इत्यादी खड्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सॅनिटाइझरचा वापर करू नका. सॅनिटाइझरमध्ये अ‍ॅल्कोहोलचा समावेश असतो. या घटकामुळे दागिने खराब होऊ शकतात. यामुळे दागिन्यांच्या रंगावरही परिणाम होऊ शकतो आणि सोबत हे दागिने तुटण्याचीही शक्यता असते. असे झाल्यास तुमच्याकडे दागिने बदलून घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. खड्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबणाचा वापर करणे योग्य ठरेल.

 

​घड्याळ

अंगठी किंवा अन्य दागिन्यांप्रमाणे आपण घड्याळ पाण्यामध्ये भिजत ठेवून आणि साबणानं धुऊ शकत नाही. घड्याळ सॅनिटाइझ करण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करावा. एक कापड घ्या आणि ते गरम पाण्यामध्ये भिजवा. एका वाटीमध्ये लिक्विड साबण घ्या. हातामध्ये Gloves घाला. यानंतर कपड्यावर थोडेसे साबण घ्या आणि आपले घड्याळ स्वच्छ करा. यानंतर स्वच्छ पाणी आणि कपड्याच्या मदतीनंच घड्याळ्यावरील साबण पुसून घ्या. घड्याळ्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

 

​हे देखील लक्षात ठेवा

एखाद्या कामासाठी किंवा बाजारातून सामान आणण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा अंगावरील दागिने आणि घड्याळ घरातच ठेवून जावे. ही खबरदारी बाळगणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. घरी आल्यावर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर दागिने पुन्हा आपल्या अंगावर घालावे. महत्त्वाचे म्हणजे या वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी हातामध्ये Gloves घालणे देखील आवश्यक आहे. अंगठी किंवा कानातले जमिनीवर बसून स्वच्छ करा. बाथरूम तसंच सिंकमध्ये दागिने, घड्याळाची स्वच्छता करणे टाळा. कारण जर चुकून तुमच्या हातून एखादी वस्तू खाली पडलीच आणि पाण्यासोबत वाहून गेली तर ती पुन्हा मिळणं कठीण आहे.

​वजनदार दागिने वापरणे टाळा

करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यकता नसेल तर वजनदार दागिने वापरणे टाळा. जड आणि वजनदार दागिने सॅनिटाइझ करणं तुम्हाला कठीण जाऊ शकते. या महामारीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची योग्य ती देखभाल करावी.

 

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..