Thursday, October 22, 2020


Home प्रेमतरंग मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या संसारात मुलीच्या आईने हस्तक्षेप करू नये?

मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या संसारात मुलीच्या आईने हस्तक्षेप करू नये?

माणसाच्या  हाताचे जसे पाचही बोटे सारखी नसतात,त्याप्रमाणे आपल्या समाजात असलेले सर्वच व्यक्ती हे एकसारखे नाहीत.याचे परिणाम काही नात्यामध्ये होत असतात प्रत्येक नात्यांमध्ये कोणी न कोणी अतिरिक्त ज्ञान असणारा असतो जो की पूर्ण संसाराची राखरांगोळी करायला मागेपुढे पाहत नाही.

काही ठिकाणी सासु चांगली असते तर काही ठिकाणी सून  चांगली असते जिथे सासू चांगली असते तिथे सून चांगली नसते.आज कालच्या जमान्यातली सगळ्यात मोठी समस्या हीच आहे काही मुलींचे चालले ते तिच्या आईला पटतच नाही परिणामी मुलीची आई मुलीच्या संसारात हस्तक्षेप करते,आणि त्यातूनच वाढत जातो तो तिच्या कुटुंबातील कलह,इतका वाढतो की संसार मोडकळीस येण्यास उशीर लागत नाही ज्यांना नाही सहन करायचं ते माहेरून आपल आयुष्य जगतात प्रत्येकाची प्रॉब्लेम असतात जे आहे त्या परिस्थितीशी सांभाळून घेते त्यांचा संसार टिकतो आणि जी मुलगी प्रत्येक गोष्ट माहेरी सांगते तिचाही संसार टिकू शकतो पण त्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे मुलीची आई ही जर समजून घेणारी असली तर प्रत्येक मुलीचा संसार तुटणारच नाही.

आयुष्य मनसोक्त जगणे हा प्रत्येक व्यक्तींचा हक्क आहे त्यात आज मुलीही कमी नाहीत मुलीही आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत जोब करून घर सांभाळणे ही त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे परंतु छोट्या-मोठ्या कारणावरून मुली  पराचा कावळा करतात व त्यांना पाठीशी घालणारी त्यांची आई हि मुलीचा संसार उध्वस्त कार्याला  मागेपुढे पाहत नाही.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलींची काळजी असतेच ते स्वाभाविक आहे परंतु आईने फोनवरून मुलीला सतत सल्ले देऊ नयेत सारखं सारखं विचारू नये यामुळे काय होतं एक दिवस असा येतो की मुलगी पूर्ण घर सोडून कायमची निघून जाते.तिला स्वतःच्या सवयी बदलेल्या वेळ लागतो यायला वेळ लागतो त्यामुळे सासूने पण तिला समजून घ्यायला हवे तिच्या जास्त अपेक्षा ठेवू नये आपल्या रूढी परंपरा तिच्यावर ती लादु नयेत दोन्ही बाजूच्या सासवा जबाबदार आहेत.मुळात प्रत्येक मुलीने सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नयेत.सासर आणि माहेर या दोन्ही जागांवर आपले अस्तित्व आणि आदर ठेवले आहेत आणि ते दोन्ही ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी सासर आणि माहेर यामध्ये तुलना करू नये सासरची गोष्ट माहेरी सांगितली तर माहेरच्या लोकांना सासरच्या लोकांनी निर्माण होतो आणि मुलीचा संसार करतो त्यामुळे कोणत्या गोष्टी माहेरी आपल्या आईला सांगायचे पूर्णता मुलीवर अवलंबून असते..

कारण शेवटी आज नाते टिकणे हे फार अवघड झाले आहे..त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागायलाच  हवे.आज काळ च्या जमान्यात कोर्टाचा विचार केला तर सगळ्यात भीषण वास्तव समोर येईल..ते म्हणजे नवरा बायकोचे भांडण आणि त्यातुंन धुळीस मिळाले ले त्यांचे संसार..जर त्यांना वेळीच चांगले मार्गदर्शन मिळाले तर कदाचित संसार तुटणार हि नाहीत. कोणाच्या यौश्यात असे प्रसंग येई नयेत पण जर का यंदा कदाचित आले तर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे..शेवट कोर्ट कचेऱ्या करून काही हि मिळत नाही.मनस्ताप,नुकसान यामधून फक्त खराब होते ते स्वतःचे आयुष्य..ज्या आयुष्यात सुखी संसाराची स्वप्न बघितली जातात त्याच संसाराची अखेर राख रांगोळी होते.  त्यामुळे श्यक्यतो कोर्ट-कचेरी टाळावी हा आमचा सल्ला…

BY-Adv.S.R.Awad (Aurangbad Highcourt)

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..