Thursday, October 22, 2020


Home मनोरंजन शिकेकाई वापरून मिळवा मुक्तता चेहऱ्यावरील मुरूम आणि सुरकुत्यांपासून...

शिकेकाई वापरून मिळवा मुक्तता चेहऱ्यावरील मुरूम आणि सुरकुत्यांपासून…

आयुर्वेदामध्ये शिकेकाईला (benefits of shikakai) भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी शिकेकाईचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आपल्या देशामध्ये बहुतांश लोकांच्या घरामध्ये ही औषधी वनस्पती आढळतेच. आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये योग्य पद्धतीनं याचा समावेश केल्यास तुमचे केस लांबसडक, घनदाट आणि मऊ होतील. शिकेकाईमध्ये ल्युपॉल, स्पिनॅस्टरॉल, लॅक्टॉन यासारखे घटक आहेत.

हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. यामुळे केसांचे दुभंगणे देखील कमी होते. शिवाय केस चमकदार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का केसांप्रमाणेच त्वचेसाठीही शिकेकाई लाभदायक आहे. खाज सुटणे, त्वचा लाल होणे, कोरडी होणे इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहे.
(Skin Care पिकलेल्या केळ्यापासून घरामध्येच करा फेशिअल, ५ मिनिटांत उजळेल चेहरा)

​खरुजवरील उपाय

maharashtra times

खरुज सारख्या त्वचा विकारांवर शिकेकाई रामबाण उपाय आहे. गरम पाणी आणि हळद एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर शिकेकाईची पावडरही त्यात मिक्स करा. हळद, शिकेकाई नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करा. आता या मिश्रणाचा अँटी सेप्टिक बॉडी वॉशच्या स्वरुपात उपयोग करा. यामुळे खरुजची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा बदाम तेलाचे २ थेंब, सकाळी दिसेल त्वचेवर नॅचरल ग्लो )

​डाग होतील कमी

maharashtra times

चेहऱ्यावर मुरुमांचे डाग राहतात. भरपूर उपाय केल्यानंतरही बऱ्याचदा मुरुमांचे डाग कमी होत नाही. पण यासाठी तुम्ही एकदा शिकेकाईचा वापर करून पाहा. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा दूध, बदाम पावडर, हळद आणि दोन चमचे मध मिक्स करा. आता हे मिश्रण बॉडी स्क्रब प्रमाणे वापरा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होईल. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.

(फेस पॅकमध्ये मिक्स करा या ३ गोष्टी, पावसाळ्यात त्वचा होणार नाही तेलकट)

सुरकुत्या कमी होतील

maharashtra times

शिकेकाईमध्ये अँटी बॅक्टेरिअलचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. एका वाटीमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर, एक चमचा हळद, मध एकत्र घ्या आणि याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. नियमित या पेस्टनं आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. या स्क्रबचा वापर केल्यास तुम्हाला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची आवश्यकता भासणार नाही.

शिकेकाईचे केसांसाठीचे फायदे जाणून घेऊया.

​केसांसाठी फायदे

maharashtra times

वाढत्या वयानुसार आपल्या केसांमध्येही बदल होऊ लागतात. पण तुम्ही योग्य देखभाल केली तर केस काळेशार आणि मजबूत राहू शकतात. केसांसाठी हर्बल प्रोडक्टचा वापर करावा. केसांसाठी शिकेकाई हा रामबाण उपाय आहे. शिकेकाईची पावडर पाण्यात भिजत ठेवा आणि या पाण्याने आपले केस धुऊन घ्या. शिकेकाईमधील अँटी सेप्टिक गुणधर्मामुळे टाळूला आलेली सूज कमी होते. केसातील कोंडा कमी होतो.

 

​आवळा आणि शिकेकाई लेप

maharashtra times

केसांना नैसर्गिक काळा रंग हवा असल्यास आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर एकत्र घ्या आणि त्याचा लेप केसांवर लावा. हे मिश्रण एक तास केसांमध्ये राहू द्यावे. यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूच्या मदतीनं केस स्वच्छ धुऊन घ्या. महिनाभर हा उपाय करा. तुमचे केस लांब आणि जाड होती. शिवाय केसांचे तुटणे, केस गळतीचीही समस्या कमी होईल.

 

​दही आणि शिकेकाई लेप

maharashtra times

एक चमचा शिकेकाई पावडर (Shikakai Benefits For Hair) आणि दोन चमचे दही एकत्र घ्या. हा लेप मुळांसह केसांना लावा. एक तास लेप केसांना (Hair Care Tips) लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. सकारात्मक परिणामांसाठी एक महिनाभर हा उपाय करावा. दह्यामुळे कोरड्या केसांची समस्या कमी होती.(copy content)

Note कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

22 COMMENTS

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..