Thursday, October 22, 2020


Home तंत्रज्ञान लॉकडाऊनमध्ये एअरटेल, वोडाफोन आयडियाला नुकसान, जिओला फायदा

लॉकडाऊनमध्ये एअरटेल, वोडाफोन आयडियाला नुकसान, जिओला फायदा

नवी दिल्लीः भारती एअरटेल आणि वोडाफोन – आयडियाला युजर्स संख्येत एप्रिल महिन्यात जबरदस्त फटका बसला आहे. एअरटेलने जवळपास ५२.६ लाख युजर्स गमावले आहेत. तर वोडाफोन – आयडियाचे ४५.१ लाख युजर्स कमी झाले आहेत. याप्रमाणे दोन्ही कंपन्यांचे जवळपास १ कोटी युजर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओला जबरदस्त फायदा झाला असून त्यांचे युजर्स वाढले आहेत.

 

मार्केट लीडर रिलायन्स जिओने या दरम्यान मार्केटची परिस्थिती ठीक नसताना सुद्धा १५.७ लाखांहून जास्त नवीन युजर्स जोडले आहेत. मार्च २०२० मध्ये जिओला जवळपास ४७ लाख नवीन युजर्स मिळत होते. त्यामुळे हा आकडा कमी आहे. परंतु, बाकी कंपन्यांच्या तुलनेत जिओची कामगिरी चांगली आहे. बाकी कंपन्यांप्रमाणे जिओचा युजरबेसला नुकसान पोहोचले नाही.

 


वेगाने वाढत आहेत टेलिकॉम युजर्स

नवीन युजर्स संबंधी आकडे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) कडून शेयर करण्यात आले आहेत. एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू असताना खूप साऱ्या युजर्संनी आपले मोबाइल कनेक्शन बंद करावे लागले होते. या युजर्समध्ये प्रवासी मजूर आणि उर्वरित युजर्सचा समावेश होवू शकतो. टेलिकॉम रेग्यूलेटरी कडून म्हटले की, एप्रिलमध्ये नवीन भारतीय टेलिकॉम युजर्स ८० लाख हून अधिक नवीन युजर्स जोडले जात आहे.

 

महाग होवू शकतात टॅरिफ प्लान
एअरटेल आणि वोडाफोन – आयडिया लिमिटेडचे युजर्स ३२.२ कोटी कमी होवून ३१.४ कोटी राहिले आहेत. जिओचा युजरबेस एप्रिलमध्ये ग्रोथ झाल्यानंतर ३८.९ कोटी झाला आहे. मार्केटची सध्याची परिस्थिती पाहता टॅरिफ प्लान महाग होवू शकतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्व कंपन्यांचे प्लान महाग झाले होते.

 

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..