Thursday, October 22, 2020


Home बीड बातमी पंकजा गोपीनाथ मुंडे...एक "जनसाथी" असलेले नेतृत्व..

पंकजा गोपीनाथ मुंडे…एक “जनसाथी” असलेले नेतृत्व..

पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष छोटासा लेख..

पंकजा ताई मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए,झालेले आहे, उच्च विद्याविभूषित असलेल्या ताई या बाबांचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकरणात आल्या…स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ताईंनी राजकरणात संघर्ष चालू केला.

गोपीनाथराव मुंडे आणि पत्नी प्रज्ञाताई मुंडे यांच्या पंकजाताई या जेष्ठ कन्या आहेत. पंकजांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळी वैजीनाथ येथे झाला. गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांना मुलगा झाल्यास त्याचे नाव पंकज आणि मुलगी झाल्यास पंकजा ठेवू असे मामा प्रमोद महाजन यांनी फार पूर्वीच ठरवले होते. हे नाव ठेवण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे त्यावेळेस भाजपाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यानुसार गोपीनाथरावांना मुलगी झाली व मामा च्या आग्रह खातर नाव पंकजा ठेवण्यात आले.

पंकजा ताई या स्व..प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत..१९९९ मध्ये त्यांचे लग्न डॉ.अमित पालवे यांच्याशी झाले..सध्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असलेले नामदार.धनंजय मुंडे यांचे  चुलत भाऊ आहेत.

पंकजा ताई यांचा राजकीय प्रवास काही सुखकारक झालेला नाही,बाबा स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या नंतर पंकजा यांनी “पुन्हा संघर्ष यात्रा ” काढली.अनुकम्पा तत्वावर काही नको जे मिळवायचे ते स्वतःच्या कर्तृत्वावर असे म्हणून त्यांनी जो संघर्ष केला तो पूर्ण देशाने पहिला आहे..जेव्हा मुंडे साहेबानी संघर्ष यात्रा केली तेव्हाही भाजपचे सरकार आले,आणि २०१४ साली जेव्हा ताई नि संघर्ष यात्रा काढली तेव्हाही भाजपचे सरकार आले हे विशेष..

“उतणार नाही मातणार नाही मोडेन पण वाकणार नाही”  साहेबांच्या याच वाक्याप्रमाणे ताई नि जो प्रवास केला आणि करत आहेत तो उल्लेखनीय आहे..आज प्रत्येक स्त्रीने ताईंचा आदर्श घेऊन आपल्या क्षेत्रात वाटचाल करायला हवी…संकटे खूप येतात पण जो संकटावर मात करतो तोच खरा सिकंदर असतो.

राजकारणातील सक्षम असे महिला नेतृत्व म्हणून आज उभा महाराष्ट्र ताईनं कडे पाहत आहे..महिला सक्षमी करणासाठी “बचतगट” च्या माध्यमातून अनेक महिलांचे जीवन सुखकर केले आहे. महिला सक्षमी करणासाठी ताईने केले ले योगदान उल्लेखनीय आहे.

त्यांच्या राजकीय जीवनात पण खूप संकटे आली पण त्यांनी न डगमगता सगळ्या संकटाना सामोरे गेल्या..माय बाप जनतेचे आशीर्वाद बाबांची पुण्याई आणि स्वतःचे कर्तृत्व त्रिसंगमामुळे निश्चितच ताई यशोशिखरावर पोहचतील यात शंका नाही.

पंकजा ताई मुंडे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आज पंकजा ताई यांचा वाढदिवस …त्यानिमित्ताने हा छोटासा लेख..जर आवडला तर शेअर कार्याला विसरू नका..

   संपादन-सागरिका आव्हाड 

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..