Thursday, October 22, 2020


Home ब्लॉग सावधान !!! लग्न करताय किंवा घरात नवीन सून आणताय मग हे एकदा...

सावधान !!! लग्न करताय किंवा घरात नवीन सून आणताय मग हे एकदा वाचाच.

मित्रांनो-लग्न करताय तर मग हा लेख खास तुमच्यासाठीच…

आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे विवाह..जर मुलगी चांगलीं मिळाली तर स्वर्गसुख आणि जर का नाही मिळाली तर नरकयातना..मित्रांनी आज काल च्या जमान्यात भारतीय कायदा हा मुलींच्या बाजूने आहे..कारण गरज होती स्त्रियांना संरक्षणाची पाठी मागच्या काळात स्त्रियांवरील वाढते अत्याचार पाहता हे गरजेचे होते परंतु आता जमाना बदलला आहे आता त्याच कायद्याची भीती दाखवून काही स्त्रियांनी लग्न म्हणजे एक पैसे कमावण्याचा बिझनेस सुरु केला आहे,त्याचा नाहक त्रास हा मुलांना सहन करावा लागत आहे..तुम्ही पण लग्न करत असाल तर खालील गोष्टी काळजी पूर्वक लक्ष्यात ठेवा..

घरात नवीन सून आणताना…

१) ज्या घरात याआधी एखाद्या मुलीची घट्स्फोटाची केस झाली असेल तर त्या घरातील स्थळ शक्यतो पाहू नये. आजकाल लग्ना संबंधीचे कायदे मुलींच्या बाजूचे आहेत. जर अश्या घरातील स्थळ करायचेच असेल तर पहिल्या केस चे सगळे कागद मागवून वाचून घ्यावेत . त्यामध्ये ती माणसे कुठल्या थराला जाऊ शकतात याचा अंदाज येइल.

२) मूलीच्या घरात तिच्या वडिलांचे काय स्थान आहे ते पहावे . मुलीचे वडिलांशी, मुलीच्या आईचे वडिलांशी कसे संबंध आहेत ते पहावे . वडिलाना घरात कितपत मान आहे ते पहावे . यावरून लग्नानंतर मुलीच्या माहेरच्यांचा मुलीच्या संसरात किती हस्तक्षेप होइल याचा अंदाज करता येइल.

३) शक्यतो शिकलेली आणि नोकरी करणारीच मुलगी पहावी . उद्या काही कारणाने पती पत्नीचे पटले नाही आणि घटस्फोटाची वेळ आली आणि मुलगी शिकलेली नसेल तर तिला पोटगी द्यायची ची जबाबदारी मूलावर येते . शिकलेली / नोकरी करणारी असेल तर पोटगी कमी / रद्द होवू शकते .

४) मूलाचे लग्न करत असताना त्याच्या नावावर कमीतकमी स्थावर जंगम मालमत्ता ठेवावी . अशी मालमत्ता मूलाच्या आई वडिलांच्या नावावर ठेवावी. तसेच सूनेला लग्नात आवश्यक तेवढेच दागिने करावेत. भरमसाठ दागिने करू नयेत. लग्न झाल्यावर सून घरात रूळल्यावर तिचे वागणे , स्वभाव समजल्यावर ३-४ वर्षानी अवश्य तिला दागिने करावेत. संसार मार्गी लागल्यावर मूलांच्या नावे संपत्ती करायला हरकत नाही . पण हिंदू विवाह कायद्यानूसार लग्नाच्या दिवसापासून सुनेचा मुलाच्या संपत्तीत अर्धा हिस्सा असतो . तसेच तिला केलेले दागिने हे तिचे स्त्रीधन म्हणून गणले जाते. त्यावर तिचाच अधिकार असतो.

अश्याच एक प्रसंगात अडकलेल्या मुलाशी आमची बातचीत झाली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली..ती जशास तश्या शब्दात पण थोडक्यात..(क्रमशः)

आजकाल बर्याचजणांसाठी लग्न हा पैसा कमावण्याचा धंदा झाला आहे आणि बहूतकरून कायदे हे मुलींच्या बाजूचे आहेत . माझ्या डोळ्यासमोर मुलग्यांच्या फसवणूकीची बरीच उदाहरणे आहेत . म्हणून वरील मुद्दे मी मांडले आहेत . कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही .

तुमचं काय मत आहे ?

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..