Friday, October 30, 2020


Home Health & Fitness अशी घ्या कानाची काळजी - Take care of your ears

अशी घ्या कानाची काळजी – Take care of your ears

Google pic

कानात अतिप्रमाणात घाण (Ear wax) जमा झाल्यास ती काडून टाकणे/घेणे गरजेचे. व ते पण तज्ञांकडूनच. पण ह्यासाठी Earbud सारख्या गोष्टी कधीही वापरू नयेत. Earbuds घातल्यामुळे कानाच्या कडेचा (margin) मळ साफ होत ही असेल पण त्याच्या (Earbud) पुढच्या टोकासमोर असलेला मळ अजूनही पुढे ढकलला जातो व ती मळकानाच्या पडद्याला (ear drum)लागून इजा पोहचवू शकतो. पडद्याला सूज येणे, पडदा फाटणे सारखे विकार होऊ शकतात. हे आपल्या लक्षात येत नाही. तरीही थोड्या प्रमाणात कानाचा मळ (Ear wax) असावा कानामध्ये. ही काही विकृती नव्हे. कानातली मळ ही कानातील Sebaceous & Ceruminous Glands च्या प्राकृत स्रावांपासून बनत असते व त्यामुळेच कानाला एक प्रकारचे आतून संरक्षण मिळते. ही मळ कानाचे मोठा आवाज होणे, पाणी/कीडा कानात आत जाणे सारख्या गोष्टींपासून बचाव करते.

कानांचे दुखणे हे डोके दुखणे, दात किडणे/दात दुखणे यामुळे सुद्धा होऊ शकते. फटाक्यांचा आवाज हा सुद्धा कारणीभूत ठरतो. जसे वय होत जाईल तसे ऐकु येण्यावर पण फरक पडत जातो. ज्यांना कमी ऐकु येते ती माणसं उच्च स्वरात/आवाजात बोलतात हे स्वाभाविक असते. अपघाताने कानाच्या पडद्याला मार बसल्याने पण बहिरेपणा येऊ शकतो. जन्मापासूनच कानाची एखादी विकृती जशी की कानाचा आकार व कानाचे छिद्र लहान असणे ह्यांचे सुद्धा परीक्षण महत्वाचे. कानात जर स्राव (discharge) असेल तर तो तज्ञ वैद्यांकडूनच पूर्ण साफ करून उपचार घेतलेले बरे. जरा देखील स्राव कानाच्या आत राहिल्यास त्रास पुन्हा होऊ शकतो. कानामुळे चक्कर सुद्धा येऊ शकते.

खूप गोंगाट असणाऱ्या आवाजाच्या ठिकाणापासून लांब राहा. त्यासःती वातावरणातील आवाजाची पातळी किती आहे, हे समजून घ्या. जर ट्रॅफिकमध्ये तुम्हाला जास्त वेळ राहावं लागत असेल तर इयरप्लग लावा. ट्रॅफिक हे सुद्धा गोंधळाचं एक रूप आहे, जे आपल्या कानांसाठी चांगलं नसतं. जर तुम्ही एखाद्या कारखान्यात मोठया आवाजात काम करत असाल तर कानांच्या सुरक्षिततेसाठी इयरप्लगचा वापर करा. जर वातावरणातील आवाज तुमच्यासाठी असह्य असेल तर अशा वातावरणातून काही वेळासाठी दूर जा.

ब्लूटुथ श्रवण यंत्र तंत्रज्ञान म्हणजे काय? What is Bluetooth Technology?

कम कीमत पर कान की मशीन अब अहमदनगर में भी उपलब्ध

👶 ऑटीजम, लक्षणे आणि उपाय – Autism, symptoms and remedies

🤰🏻प्रेग्नन्सीत कारले खावे कि नाही? वाचा!

धूम्रपान कसे सोडता येईल 🚭

आपला चेहरा ताजातवाना असावा असं सगळ्यांनाच वाटतं

तुम्ही तणावात आहात का? कसं ओळखायचं?

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..