Thursday, October 22, 2020


Home आरोग्य 'या' फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात कामाचा लोड जास्त असल्यामुळे घरात असलं तरीही १३ ते १४ तास म्हणजेच दिवसातील अर्धा वेळ हा लॅपटॉपसमोर एका जागी बसून काम करावं लागत आहे. अशामुळे शरीराची काहीही हालचाल होत नाहीये आणि अनेक लोकांना फिटनेस बाबतीत समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यातील सर्वात मोठी आणि चिंता वाढवणारी समस्या आहे ओटीपोटावरील चरबी वाढणं. यामुळे वजनात तर वाढ होतच आहे शिवाय लुक खराब होतोय, बरं इतकंच नाही तर पहिले फिट बसणारे कपडे देखील यामुळे येत नाही आणि जरी आले तरी त्वचेवर एकदम घट्ट बसल्याने शरीराचा आकार बरोबर वाटत नाही.

अशा एक ना अनेक समस्यांनी भंडावून सोडलेलं असताना लोकांना व्यायाम, योगा, डायट, एक्सरसाईज या गोष्टीकडेही लक्ष देण्यासाठी विशेष वेळ मिळत नाही. या समस्येने खास करुन मुली जास्त वैतागल्या आहेत कारण आपल्याला तर माहितच आहे स्टनिंग लुक आणि सडपातळ बांधा याविषयी मुली किती काळजीपूर्वक वागणा-या असतात. त्यामुळे ओटीपोटावर वाढत चाललेली थोडीशी चरबी किंवा थोडंसं पुढे आलेलं ओटीपोट देखील त्यांच्या चिंतेचं कारण बनू शकतं. पण मंडळी आता या अतिरिक्त चरबीचं टेन्शन घेऊन बसू नका कारण आम्ही खाली दिलेली ही फळं काहीच काळात तुमची ओटीपोटावरील चरबी कमी करुन तुमचा स्टनिंग आणि गॉर्जियस लुक परत मिळवून देतील.

डाळींब

  1. डाळींब हे एक असं फळ आहे जे सामान्यत: शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढणारे फळ म्हणून ओळखले जाते. बहुतांश लोक डाळींब घरात तेव्हाच आणतात जेव्हा डॉक्टर ते खाण्याचा सल्ला देतात कारण डाळींबाचे दाणे काढण्याची प्रक्रिया ब-याचजणांना किचकट काम वाटतं. पण डाळींब खाण्याचा सल्ला डॉक्टरांना द्यावा लागेल अशी परिस्थिती तुम्ही येऊच का देता?
  2. डाळींबातील पोषक तत्व शरीराला द्यायचे असतील तर तुम्हाला नियमिक डाळींबाचे सेवन करणे आवश्यक आहे. डाळींबात लोह देखील मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही दिवसाला १ जरी डाळींब खाल्ले तरी दिवसभर तुमच्या शरीरात उर्जा राहिल आणि तुम्ही फ्रेश फिल कराल. सोबतच यामुळे पचनक्रिया सुरुळीत होऊन ओटीपोटावरील चरबीही जळून जाईल.

सफरचंद

फायबरने भरलेल्या फळांची जेव्हा जेव्हा नावं येतात तेव्हा सफरचंदाचं नाव लिस्टमध्ये सर्वात टॉपवर असतं. शरीर निरोगी ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे एका सफरचंदाचे नियमित सेवन करणं. जे लोक दररोज १ सफरचंद खातात त्यांचे शरीर सदैव एक्टिव राहते. कारण सफरचंद सतत शरीराला उर्जेचा पुरवठा करत राहते आणि आळस निर्माण करणा-या विषारी पदार्थांना शरीरात जमा होऊन देत नाहीत. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले फायबर पचनक्रिया सुरुळीत ठेवते आणि शरीरात फॅट जमा होऊन देत नाही व चरबी कमी होते.

पेर

पेर हे बहुगुणी असं एक फळ आहे. पेर खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होऊन शरीरातील अनावश्यक चरबी देखील जळून जाते. पेर मध्ये असणारे पोटॅशियम, कॉपर आणि झिंक हे गुणधर्म शरीराला सतत उर्जा प्रदान करण्याचं कार्य करतात. यामुळे तुम्ही दिवसभर स्वत:ला उर्जावान फिल करता. यामुळे थकवा आणि ताणतणाव दूर होतात ज्यामुळे आपण दिवसभर कितीही शारीरिक श्रमाची काम करु शकतो. श्रमामुळे शरीरावर अधिक फॅट जमा होत नाही.

अननस

अननस म्हणजेच पायनॅपल हे एक असं फळ आहे जे वर्षभर मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होते. शरीराला व्हिटॅमिन क ची पूर्तता करण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी अननसाचे आपण नियमित सेवन करु शकतो. तुम्हाला जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल की अननस शारीरिक थकवाच नाही तर मानसिक थकवा आणि ताण देखील दूर करतं. यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून ती शरीराबाहेर फेकण्याचं काम करतं. त्यामुळे आपण फिटही राहू शकतो आणि स्लिम देखील दिसू शकतो.

केळी

केळ वर्षोचे बाराही महिने आणि प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे फळ आहे. केळ्यात लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६ हे गुणधर्म आढळतात. ब-याच लोकांचा गैरसमज असतो की केळ खाल्ल्याने फॅट वाढतं. जे की एकदम चुकीचं आहे. पौष्टिक गुणांनी भरलेलं केळ खाल्यानंतर दूध प्यायलं तर शरीरातील मसल्स मजबूत होतात. जर तुम्ही फ्रुट चाटमध्ये केळ्यांचा वापर केला तर ते शरीराला उर्जावान बनवायला आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकायला मदत करते.

पेरु

पेरुचे सेवन पोट साफ ठेवण्यास, पचनक्रिया सुरुळीत ठेवण्यास आणि शरीरातील इंप्योरिटीजला दूर ठेवण्यास मदत करतं. जर तुम्ही पेरुचे सेवन काळं मीठ आणि जीरा पावडरसोबत केलं तर ते शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकण्याचंही काम करतं. यामुळे आपली बॉडी शेपमध्ये राहते.

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..